दोन खुनाच्या गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार आरोपीस अटक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २८ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे फलटण शहर पोलीस ठाण्यातील दोन खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी रोशन एडिसन उर्फ अविनाश भोसले (वय २२, मूळ रा. अकलूज, ता. माळशिरस, जि.सोलापूर) हा गुन्हा केल्यापासून तीन वर्षे फरार होता. हा आरोपी सातारा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार तसेच इतर अंमलदार रवाना करून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे वरील आरोपीस पोलीस पथकाने सातारा शहर येथे शिताफीने ताब्यात घेतले. या आरोपीस सदर गुन्ह्यात पुढील तपासकामी अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापूसाहेब बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे, स.फौ. संतोष कदम, संजय भांडेपाटील, पो.ह. चंद्रकांत धापते, पो.कॉ. काकासाहेब कर्णे यांनी केली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!