फलटणच्या दोघा मित्रांचा पुणे-पंढरपूर महामार्गावर अपघाती मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १६ मे २०२३ | फलटण |
फलटण शहरात अतोनात कष्ट करून एक उत्तम व्यावसायिक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या दोन मित्रांचा पुणे-पंढरपूर महामार्गावर ताममळा येथे अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबतची माहिती अशी, मैत्री कशी असावी व कष्ट कसे करावे, हे अंमलात आणणारे व हे प्रत्येकाला शिकवणारे अमीर शेख व गणेश लोंढे (दोघेही रा. फलटण) हे दोघे मित्र होते. ते दोघेही फलटणला येत असताना पुणे-पंढरपूर महामार्गावर ताममळा येथे अपघात होऊन त्यांचे निधन झाले. ते माणुसकीचे नायक होते. एकत्र राहिले… एकत्र गेले…!

आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून फलटणकरांच्या जीभेवर अधिराज्य गाजविणारे व जिभेचे लाड पुरवणारे अमिरभाई व गणेश यांच्या जाण्याने फलटणकरांवर शोककळा पसरली आहे. त्यांना समस्त फलटणकरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली!


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!