रूद्रनील फाउंडेशनचे संस्थापक ओंकार कदम यांचे अपघाती निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २५ मे २०२२ । सातारा । शेंद्रे (ता. सातारा) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व रूद्रनील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ओंकार सुरेश कदम (वय 34) यांचे काल रात्री झालेल्या अपघातात निधन झाले.

काल रात्री ते रहिमतपूर रस्त्याने साताऱ्याकडे येत असताना जैतापूर गावानजीक अनोळखी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ओंकार कदम हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटचे कार्यकर्ते म्हणून परिचित होते. रुद्रनील फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सामाजिक कामाचा ठसा उमटविला होता. विशेषतः कोरोना काळात त्यांनी भरीव उपक्रम राबविले होते. ऊसतोड कामगारांना मदत, गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार, आरोग्य शिबिरांचे आयोजन
यासारखी कामांतून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पत्नी या शेंद्रेतील अजिंक्यतारा संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आई आशा कदम या नागठाण्याच्या केंद्रशाळेत सेवा बजावत आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेंद्रेतील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.

Back to top button
Don`t copy text!