बिहारकडे मजुर घेऊन जाणार्‍या ट्रॅव्हल्सचा अपघात


एकाचा जागीच मृत्यु तर तीस जण गंभीर जखमी

स्थैर्य, नांदेड, दि. 19 : सोलापूरहून बिहार राज्यातील औरंगाबाद, गया जिल्ह्यातील अंदाजे तीस मजूर घेऊन जाणार्‍या ट्रॅव्हल्सचा खेडकरवाडीजवळ ता. लोहा अपघात झाला असुन, एक जण जागीच मृत्यू झाला आहे तर अंदाजे अठ्ठावीस ते तीस मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

कोरोना विषाणू वाढत्या संसर्गामुळे देशभरात सध्या लॉकडाऊन सुरु असुन अन्य राज्यातील मजुरांचा प्रश्नही गंभीर बनला आहे, आपापल्या राज्यात परतण्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब करुन सध्या मजूर गावी परतत आहेत, असेच सोलापुर येथे कामानिमित्य असलेले बिहार राज्यातील औरंगाबाद गया जिल्ह्यातील मजूर ट्रॅव्हल्स क्र एम.एच 13 ए.एक्स 0774 ने बिहारकडे जात असताना माळाकोळी जवळील खेडकरवाडी पुलाजवळ आले असता रात्री 10:45 वा अपघात झाला. यामध्ये एक मजूर जागीच ठार झाला असुन इतर अंदाजे अठ्ठावीस ते तीस मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याने जखमींचा व मृत्युंचा आकडा कळण्यास अडचण येत आहे. अपघात स्थळाचे चित्र पाहिल्यावर अनेक जण गंभीर जखमी असण्याची शक्यता वाटत आहे. घटनास्थळी मालाकोळी पोलिसांनी तातडीने हजेरी लावत मदत कार्य सुरु केले आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष माऊली गिते व त्यांच्या सहकार्यांनीही जखमींना बाहेर काढुन दवाखान्यापर्यंत पोहचवण्यासाठी मदत केली. जखमींना लोहा व नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!