फलटणच्या शिवाजीनगरातून युवक बेपत्ता

दैनिक स्थैर्य | दि. १८ सप्टेंबर २०२३ | बारामती |
फलटण शहरातील श्री सिद्धनाथ गणेश तरुण मंडळ शिवाजीनगर येथून दि. १७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून अजित पोपट बुरुंगले (वय २४, रा. नगर परिषद शाळा क्र.७ च्या पाठीमागे, शिवाजीनगर, फलटण) हा युवक हरवला आहे. याबाबतची फिर्याद त्याचे वडील पोपट बुरुंगले यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली.
अजित बुरुंगले याचे शिक्षण १२ वी झाले असून तो अंगाने मध्यम, रंगाने सावळा, उंची ५ फुट ५ इंच, नाक सरळ, डोळे काळे, केस कुरळे व काळे, अंगात निळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व काळे रंगाची फुल पॅन्ट, पायात चप्पल, सोबत मोबाईल नं.९७३०१५२३०७ तसेच तो तोतर्या भाषेत मराठी बोलतो.
अजित बुरुंगले याची कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित फलटण शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी अधिक तपास पो. ना. बोबडे करत आहेत.