मद्यधुंद ट्रकचालकाची महावीर स्तंभाच्या संरक्षण भिंतीला धडक


दैनिक स्थैर्य | दि. १८ सप्टेंबर २०२३ | बारामती |
फलटण नगर परिषद हद्दीतील महावीर स्तंभाच्या कडेला बांधलेल्या संरक्षण भिंतीच्या लोखंडी ग्रीलच्या कंम्पाऊंडला जोराची धडक दिल्याने या अपघातात भिंतीचे सुमारे ३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मद्यधुंद ट्रक (एमएच०५ईएल७८१५) चालक अक्षय राजेंद्र लोंढे (वय २३, रा मांडवखडक, ता. फलटण) याच्याविरोधात फलटण शहर पोलिसात अनुप शहा यांनी फिर्याद दिली आहे. हा अपघात काल रात्री ८ वाजता घडला.

पुढील तपास म.पो.ना. बोबडे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!