
दैनिक स्थैर्य । दि. २० नोव्हेंबर २०२२ । फलटण । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये काम करत असणाऱ्या कंत्राटदारांना बाजारभावापेक्षा कमी दराने महावितरणची कामे करावी लागत होती. परंतु गेले काही वर्षांपासून ही कामे बंद करण्याचा निर्णय कंत्राटदारांनी घेतलेला होता. ही बाब विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी तातडीने महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंघल यांना फोन करून सदरील प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले. श्रीमंत रामराजेंच्या फोन नंतर महावितरण कंपनीचा राज्याचा बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली निघाला. याबद्दल सातारा जिल्ह्यासह राज्यातील महावितरण कंपनीचे कंत्राटदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे आभार मानत आहेत
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्थातच महावितरण या कंपनीची विविध कामे ही कंत्राटदार करीत असतात. परंतु गेले पाच वर्षांपासून महावितरण कंपनीने कंत्राटदारांना देण्यात येणाऱ्या निविदांमध्ये कोणतीही वाढ न केल्याने महावितरण कंपनीची कामे न करण्याचा निर्णय कंत्राटदारांनी घेतलेला होता. तर यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी सातारा जिल्हा इलेक्ट्रिकल फेडरेशन असोसिएशनच्या वतीने विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे करण्यात आली. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणताही विलंब न करता थेट महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंघल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला व हा प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निर्देश दिल्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवशी महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंघल यांनी एक परिपत्रक काढून राज्यांमधील सर्व विभागातील निविदांमध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची कार्यपद्धतीही संपूर्ण राज्याला ज्ञात आहे. राज्यातील कोणताही प्रश्न जर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आला तर तो प्रश्न सोडवल्याशिवाय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा शांत बसत नाहीत. बघू, करू, असे म्हणत वेळ सुद्धा काढत नाहीत. तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे तातडीने संबंधित अधिकाऱ्याला स्वतः फोन करून त्या प्रश्नाची सखोल माहिती घेतात व त्यावर काय तोडगा काढता येईल, याबाबतीत सुद्धा ते आग्रही असतात.
आपल्याकडे आलेल्या माणसाचे काम रखडून ठेवणे असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना जमत नाही. आलेल्या माणसाला त्याच्यासमोर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून सदरील प्रश्न निकाली काढण्यासाठी किंवा सदरील विषय मार्गी लागण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कायमच आग्रही असतात. यामुळेच सातारा जिल्ह्यासह राज्यातील विविध नागरिक, पदाधिकारी, अधिकारी हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे विविध प्रश्न घेऊन येत असतात व ते प्रश्न मार्गी लागणार याची खात्री सुद्धा सर्वांना असते.