कोळकी येथे एकास धारदार शस्त्रांनी वार करून लुटले


दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२४ | फलटण |
कमिन्स कंपनी, सुरवडी येथून कामावरून मोटारसायकल (क्र. एमएच-१४-जेएफ-२३५५) वरून घरी येत असताना अभिषेक विठ्ठल गुंजवटे (वय २४, रा. झिरपवाडी, ता. फलटण) यांना २० जून रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमरास कोळकी येथील महाराजा बझार येथे पाठीमागून मोटार सायकलवरून येवून चौघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून लुटल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत अभिषेक गुंजवटे हे जखमी झाले असून त्यांच्याकडील मोबाईल, हातातील सोन्याची अंगठी हिसकावून नेली आहे. यावेळी चोरट्यांनी गुंजवटे यांना लाथाबुक्क्यांनी, दगडानेही जबर मारहाण केली असून या प्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशन चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोट्या फडतरे, शुभम धुमाळ, संदीप हुंबे (तिघे राहणार धुमाळवाडी, ता. फलटण), नवनाथ सूर्यवंशी (रा. सोनवडी, ता. फलटण) अशी संशयित आरोपी चोरट्यांची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दातीर करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!