साकवच्या वतीने शनिवारी चित्रकार शिंदे यांचे व्याख्यान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ जानेवारी २०२४ | सातारा |
साहित्य कलावर्तक मंडळी, सातारा यांच्या वतीने शनिवार, दि. २७ रोजी ‘चित्रातले चित्र रंग’ या विषयावर ज्येष्ठ चित्रकार अभिजीत शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. यापूर्वी जेष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांनी ‘नाट्यरंग’ या विषयावर पहिले पुष्प सादर केले होते. त्यांच्या व्याख्यानाला सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिला होता.

चित्रकार अभिजीत शिंदे यांचे व्याख्यान दीपलक्ष्मी सभागृह, कन्या शाळेमागे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या व्याख्यानात ते चित्रकला म्हणजे काय? रंग कशाला म्हणायचे? चित्र निर्मितीची प्रक्रिया कशी असते? सर्जनशीलता हा एक प्रवास आणि चित्र कसे पाहावे, यासारख्या मुद्द्यांवर विषय विस्तार करणार आहेत.

या कार्यक्रमास कलारसिकांनी अगत्याने यावे, असे आवाहन साहित्य कलावर्तक मंडळी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!