
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ९ जून २०२४ | फलटण |
फलटण शहरातील सोमवार पेठ येथे राहणार्या एका कुटुंबाला त्यांच्या शेजारी राहणार्या नातेवाईक कुटुंबाने दि. ५ ते ६ जून २०२४ या कालावधीत शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याची फिर्याद पीडित कुटुंबाने फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यावेळी आरोपी कुटुंबाने फिर्यादीच्या घराच्या काचा फोडून घरासमोरील पोर्चचेही नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेत फिर्यादीसह त्याची पत्नी व मुलगा जखमी झाला आहे. या मारहाणप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी सुमारे आठजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
