आसनगाव येथे कृषिदूतांनी दिले आंबा कलम बांधण्याचे प्रात्यक्षिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२४ | फलटण |
कोरेगाव तालुक्यातील आसनगाव येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषि महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमांतर्गत शेतकर्‍यांना ‘कोय कलम’ याविषयी माहिती दिली.

आसनगाव येथील शेतकर्‍यांचे फळबागेतील आंब्याचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच उच्चप्रतीचे आंबा रोप तयार कसे करावे, हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

‘कोय कलम’ ही साधी व सोपी पध्दत असून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमे तयार करता येतात. एका वर्षात ही कलमे लागवडीसाठी तयार होतात व या पध्दतीत ७५-८० टक्के यश मिळते. यामध्ये साधारण १५ ते २० दिवसांच्या रोपाला उच्चप्रतीचे आपल्याला हव्या त्या वाणाचे आंब्याचे कलम शास्त्रशुद्ध पध्दतीने कसे बांधावे. याचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना देण्यात आले.

यावेळी कृषीदूत शुभम मोरे, सिद्धांत फडतरे, विजय नाळे, अनिकेत मदने, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक खोसे, अजिंक्य मोरे यांनी प्रात्यक्षित दाखवले.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितीषा पंडित तसेच प्रा. संजय आडत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.


Back to top button
Don`t copy text!