
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : चेतन बाळू जाधव हा बारामती बाजूकडून फलटण बाजूकडे येणारे रोडवर होंडा कंपनीच्या डिओ या मोटारसायकल वरून पांढरे रंगाच्या कॅन मधून 30 लिटर काढिव हातभट्टीची, आंबट, गुलचट व उग्र वासाची दारू मोटारसायकल वरून विना परवाना विक्री करण्याच्या हेतूने जाताना आढळून आला. त्याला मुद्देमालासह पकडण्यात आले असून त्याच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली.
