सुरवडी येथे महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ९ मे २०२३ | फलटण |
सुरवडी, १५ फाटा, ता. फलटण येथे जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रवींद्र हनुमंत जगताप व हनुमंत निवृत्ती जगताप (दोघेही रा. सुरवडी १५ फाटा, तालुका फलटण, जिल्हा सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या घटनेची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ७ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरवडी १५ फाटा, तालुका फलटण गावच्या हद्दीत फिर्यादीचे घराचे पाठीमागे असलेल्या कॅनॉलला फिर्यादीची पत्नी कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी रवींद्र हनुमंत जगताप हा तेथे येऊन फिर्यादीच्या पत्नीस म्हणाला की, ‘तू मला फार आवडतेस, तू तुझा नवरा सोडून दे’, असे म्हणून त्याने फिर्यादीच्या पत्नीचा उजवा हात धरून त्याच्याजवळ ओढले व तिच्या अंगाशी झोंबाझोंबी केली व फिर्यादीच्या पत्नीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. झालेल्या प्रकाराबाबत फिर्यादी हे आरोपीस विचारणा करण्यास गेले असता आरोपी रवींद्र हनुमंत जगताप व त्याचे वडील हनुमंत निवृत्ती जगताप (दोघेही राहणार सुरवडी १५ फाटा) यांनी फिर्यादीस ‘तुम्हाला कशाची लाज आहे, तुम्ही घाणीतली माणसे घाणीतच राहणार’, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली व तुम्हाला येथून हाकलून देणार आहे, अशी धमकी दिली. अशी तक्रार पीडितेच्या पतीने पोलिसात दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी वरील दोघा आरोपींविरोधात जातीवाचक शिवीगाळ व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे करत आहेत.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!