प्राण्यांचा छळ केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
बरड (ता. फलटण) एसटी स्टॅण्डजवळ दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता फलटण ग्रामीण पोलिसांनी आयशर टेम्पोतून दहा म्हैशी व एक रेडा (वय अंदाजे ५ ते ७ वर्षे) त्यांच्या चारापाण्याची सोय न करता दाटीवाटीने बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी घेऊन जाताना पकडून त्यांची सुटका केली. यावेळी प्राण्यांचा छळ केल्या प्रकरणी तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या वेळी म्हैशींची वाहतूक करणारा आयशर टेम्पो (क्र. एमएच-०३-डीव्ही-६५७८) पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

रफिक वाहिद सय्यद (वय ३०, रा. न्यू गौतमनगर, प्लॉट नं. २ देवनार पोलिस ठाणे समोर गोवंडी, मुंबई), अलीम रफिक कुरेशी (रा. कुरेशी नगर, फलटण) व नसीम खान अली लडू मुस्तकीन खान (रा. शिवाजीनगर, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या घटनेचा अधिक तपास पो. हवा. साबळे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!