महिलेचा विनयभंग तसेच जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १४ नोव्हेंबर २०२२ । सातारा ।  महिलेचा विनयभंग तसेच जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणारी महिला आपल्या घरात आंघोळ करत असताना घराशेजारील राहणाऱा युवक हा तिचा व्हिडिओ काढत असताना दिसला. त्यामुळे तिने त्याबाबत विचारणा केली असता त्याची आई आणि त्याच्या आजीने संबंधित महिलेस जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपाधीक्षक शिंदे करीत आहेत.

Back to top button
Don`t copy text!