दैनिक स्थैर्य | दि. २४ जून २०२३ | फलटण |
उपळवे (ता. फलटण) येथील स्वराज साखर कारखान्याच्या फसवणूक प्रकरणी इरफान गोसमद्दीन शेख, रेहान रफिक शेख (दोघेही रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व शिवाजी केशव पाटील (रा. चांदापुरी, ता. माळशिरस) या तिघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी प्रदीप बाबासो मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वराज साखर कारखान्याबरोबर ०३/०८/२०२२ रोजी व दिनांक ०५/०८/२०२२ रोजी १०.०० वाजता प्रत्यक्ष हजर राहून उपळवे येथे ट्रॅक नंबर एम एच ०४ एच १८२४, एम एच ४५-७०२ व एम एच ए ओ ३२९६ या वाहनांचा करार केलेला होता. सदर करारापोटी कारखान्याने त्यांना दिनांक १०/०८/२०२२ ते दिनांक २९/९/२०२२ रोजी २६ लाख रुपये दिले होते. वर नमूद करारामध्ये ठरल्याप्रमाणे ट्रॅक्टर हजर केलेले नाहीत. याउलट सदर इसमांनी ट्रॅक्टरची खोटी नोंदणी प्रमाणपत्र दिलेले आहेत. आरोपींनी कारखान्याला फत ६,५८,२८०/- रुपये परत दिलेले आहेत. बाकीचे पैसे मागण्यास गेल्यावर ते कारखान्याचे अधिकारी सचिन शेडगे व अनिलकुमार तावरे यांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीची भाषा करीत आहेत, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
या प्रकरणी अधिक तपास सपोनि शिंदे करत आहेत.