दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
बुवासाहेब नगर, फलटण येथील महावीर संभाजी कोकरे यांनी २२ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री २.३० वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विजेची घरावरील सर्व्हिस वायरला मीटरच्या अगोदर एमसीबीच्या साह्याने चोरी केल्याचे तपासात आढळून आले आहे. या चोरीप्रकरणी कोकरे यांच्यावर फलटण शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकरे यांनी व्यावसायिक एकूण ३,६८,८५०/- रुपयांची वीज व तडजोड देयक १०००० रुपये अशा रकमेचे बिल न भरल्यामुळे वीज कंपनीने त्यांच्याविरोधात कंपनीची फसवणूक व चोरी केल्याची फिर्याद दाखल केली आहे.
या चोरीचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे हे करीत आहेत.