पूर्ववैमनस्यातून कोयता, चाकू व पेव्हर ब्लॉकने मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरातील रविवार पेठ येथे दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून फिर्यादी निखिल नंदकुमार पवार (रा. भाडळी बुद्रुक, ता. फलटण) यास त्याच्या नातेवाईकास कोयता, चाकू व पेव्हर ब्लॉकने मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी चौघांविरोधात फलटण शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल उर्फ मेजर शिवाजी पवार, रोहन शिवाजी पवार, राधा सूरज भोसले व भुवनेश्वर सिद्धेश्वर काळे (सर्व राहणार शारदानगर, कोळकी, ता. फलटण) अशी गुन्हा झालेल्यांची नावे आहेत.

या मारहाणी प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, या मारहाण प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी फलटण शहर पोलिसात दाखल झाल्या असून अधिक तपास पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!