
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सातारा । महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 16 जून ते 23 जुलै पर्यंत वरचेवर हर्षद शंकर फडतरे वय २२ राहणार चंचळी, तालुका कोरेगाव याने एका विवाहितेचा पाठलाग करून तसेच वेगवेगळ्या ठिकाणी संबंधित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याबाबत हर्षद फडतरे याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुंभार करीत आहेत.
