
दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२२ । सातारा । युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका युवतीस सचिन जनार्दन शिंदे राहणार सोनगाव, तालुका सातारा याने भेटून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक पवार करीत आहेत.