
दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्हा सर्व धर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर्स संघटनेच्या वतीने फेरीवाला धोरण समिती 2009 या नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि हॉकर्स झोन तयार करून तेथे विक्रेत्यांना पुनर्वसन मिळावे अशी मागणी सर्व धर्मीय सुशिक्षित बेरोजगार होकर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यासंदर्भात पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन देण्यात आले या निर्णयाच्या अंमलबजावणी न झाल्यास येत्या 26 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सादिक पैलवान यांनी दिला आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले या निवेदनात नमूद आहे की हॉकर्स संघटनेचे राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 पासून पथविक्रेता समितीची स्थापना करण्यात आली नाही संघटनेच्या वतीने हायकोर्ट मध्ये 652,2187 क्रमांकाची केस दाखल आहे हॉकर्स झोन तयार करून त्यामध्ये फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे असे आदेश असतानाही पालिका कर्मचारी आणि प्रशासनाकडून यात निर्णयाची अंमलबजावणी होत नाही सातारा जिल्ह्यातील गरीब व्यवसाय करणारे आणि रस्त्यावर विक्री करणारे सामान्य विक्रेते आहेत या झोनची निर्मिती व्हावी तोपर्यंत नगरपालिका पोलीस प्रशासन यांनी हॉकर्स वाल्यांना अजिबात त्रास देऊ नये व बायोमेट्रिक सर्वे पूर्ण करून त्यांना तात्काळ ओळखपत्र देण्यात यावीत मात्र वेळोवेळी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना या संदर्भात वेळोवेळी निवेदने देऊन मीटिंग मध्ये चर्चा करूनही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे येत्या 26 जानेवारी रोजी हॉकर्स झोनच्या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व विक्रेते आत आत्मदहन आंदोलन करणार आहोत यावेळी जर काही बरे वाईट झाले असेल याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा संघटनेच्या वतीने सादिक पैलवान यांनी दिला आहे.