
दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२२ । मुंबई । सम्यक कोकण कला संस्था (रजि.) या संस्थेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेच्या कलावंतांच्या सुमधुर सप्तसुरांनी महामानवास मानवंदना व भावस्वरांजली कार्यक्रम सम्यक कोकण कला संस्थेच्या चिंतामणी रा. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृह, विरार (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमास रिपब्लिकन सेना अध्यक्ष तथा बौद्धजन पंचायत समितीचे सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर, मा. आमदार लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, युवा आमदार क्षितिजजी ठाकूर, वसई विरार महानगरपालिका महापौर रुपेशजी जाधव, भाजपचे मुंबई उपाध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक सिध्दार्थजी गमरे, बहुजन विकास आघाडी विरारचे मा. नगराध्यक्ष राजीवजी पाटील, संघटक बहुजन आघाडीचे मा. नगरसेवक अजीवजी पाटील, मा. नगरसेवक प्रशांतजी राऊत, प्रहार जनशक्ती पक्षचे पालघर जिल्हाध्यक्ष हितेशजी जाधव आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.
मुकुंदराव तांबे, विनोदजी धोत्रे, उदयराज गमरे, महेंद्र तांबे व अनिल रिंगणेकर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले असून बौ.पं.स. गट क्र. ३६चे गटप्रतिनिधी अजित तांबे, बौ.पं.स. गट क्र. ३५चे सेक्रेटरी सुधीर साळवी, बौ.पं.स. गट क्र. ३७ चे गटप्रतिनिधी सुरेशजी मंचेकर, समाजसेवक संघराजजी तांबे, रि.सेना पालघरचे लवेशजी लोखंडे, वंचित बहुजन आघाडी पालघर कोषाध्यक्ष दयानंदजी जाधव, महिला अध्यक्ष गीता जाधव, संजयजी गायकवाड, उद्योजक बाळा रंजारे, उद्योजक मनोज मर्चंडे, उद्योजक अशोक कवाडे, समाजसेवक जितेंद्र जाधव, समाजसेवक उद्धवजी सोनपसारे, सम्यक कोकण कला संस्थेचे कार्याध्यक्ष भगवानजी साळवी, अध्यक्ष भार्गवदास जाधव, सचिव राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, कवी/गायक दिलराज पवार, बहुजन हितवर्धक कला संस्थेचे संस्थापक प्रदीप खेत्रे, अध्यक्ष संतोष गमरे, सचिव शिवाजी मोहिते, बौद्धजन समाजसेवा संघ मंडनगडचे सचिव शरदजी येवले, बौद्धजन समाजसेवा संघ ग्रामीण व मुंबई मध्यवर्ती व मुख्य कमिटीचे उपाध्यक्ष अशोक तांबे, महाड पोलादपूर कलावंत संघाचे अध्यक्ष रविंद्र तांबे, भिम क्रांती कला मंच दापोलीचे अध्यक्ष गौतम जाधव, सचिव अनिल जाधव, सम्यक मित्र मंडळ नाना-नानी पार्कचे अध्यक्ष शशिकांत मोरे, कवी राष्ट्रापाल सावंत, धम्मदिप सांस्कृतिक कला मंच दापोलीचे अध्यक्ष अरविंदजी उके, सचिव अमरदीप जाधव, खेड तालुका एकता कला मंचचे अध्यक्ष विठ्ठलजी तांबे, सचिव संदीप सकपाळ, युगंधर कला मंच संगमेश्वर तालुका अध्यक्ष सुनिलजी जाधव, सचिव संदीप जाधव, आं. कलावंत संघ क्रांतिभूमी महाडचे अध्यक्ष मंगेश जाधव, सचिव मधुकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी नालासोपारा, विरार मधील बौद्धजन पंचायत समितीच्या सर्व अध्यक्ष, सेक्रेटरी, पदाधिकारी, आजी-माजी कार्यकारिणी, सभासद, महिला मंडळ, रसिक श्रोतागण यांनी वरील कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस भावस्वरांजली अर्पण करावी असे प्रतिपादन सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.