कच्चा माल पुरवण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला नऊ लाखांचा गंडा


स्थैर्य, सातारा, दि.१४: शहरालगत असणार्‍या समर्थनगर परिसरात राहणार्‍या एका व्यावसायिकाकडून कच्चा माल पुरवठा करण्याच्या नावाखाली 9.97 लाख रुपये घेऊन पलायन करणार्‍या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विक्रमसिंह हणमंत राजेकुंभार (रा. समर्थनगर, सातारा) हे व्यवसायिक असून त्यांना प्रसाद गणेश पाठक  याने प्लास्टिकच्या मालासाठी कच्चा माल पुरवितो, असे सांगून 9 लाख 97 हजार 100 रुपये घेतले आणि दोन दिवसांत मालाचा पुरवठा करतो, असे दि. 27 नोव्हेंबर  रोजी सांगितले. दोन दिवसानंतर त्याने मालाचा पुरवठा केला नव्हता. त्याला ज्या-ज्यावेळी फोन करण्यात आला त्या-त्यावेळी त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. प्रसाद पाठक याने 5 डिसेंबर पासून त्याचा मोबाईल बंद करुन ठेवला आहे. त्यामुळे विक्रमसिंह राजेकुंभार यांनी शुक्रवार, दि. 12 रोजी पाठकच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस नाईक पाटील हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!