दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
गिरवी, ता. फलटण येथे बोनालीचा गरूड जातीचा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. या गरूडाला फलटण येथील नेचर अॅण्ड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीचे सदस्य निखील जाधव, गणेश धुमाळ, गणेश शिंदे, साकेत अहिवळे, बोधीसगर निकाळजे यांनी घटनास्थळी जाऊन वनविभागाचे अधिकारी कुंभार, वनरक्षक सौ. लवांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूपपणे पकडून पुढील उपचारासाठी वनविभाग फलटण यांच्याकडे सुपूर्द केला.
अशा प्रकारचे वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास संस्थेला किंवा वनविभागाला संपर्क करण्याचे जाहीर आवाहन संस्थेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.