
स्थैर्य, फलटण, दि. २६: फलटण तालुक्यातील नवामळे, ठाकुरकी येथील जिजाई उद्योग समुहाचे शिल्पकार किसनराव रूस्तुम शिंदे यांनी वयाच्या ८५ वर्षी कोरोनावर यशस्वी रित्या मात केलेली आहे. सध्या फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना आजाराचे रूग्ण हे झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्ये फलटण तालुक्यातील ८५ वर्षीय किसन रूस्तुम शिंदे यांनी कोरोनावर उपचार घेवुन यशस्वी पणे मात केलेली आहे. त्यांच्या जिद्दीमुळे त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याचे बोलले जात आहे.
दि. ११ एप्रिल २०२१ रोजी किसनराव रूस्तुम शिंदे यांची पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी ही पॅाझीटिव्ह आली. त्यानंतर शिंदे यांनी फलटण येथील सिध्दनाथ हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या देखरेखीखाली कोरोनाचे संपुर्ण उपचार घेतले. त्यानंतर २५ एप्रिल २०२१ ला पुन्हा म्हणजेच दुसरी कोरोना चाचणी केल्यानंतर शिंदे यांची कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली. शिंदे यांच्या जिद्दीमुळे त्यांनी कोरोनावर यशस्वी रित्या मात केली.
मला काहीही होणार नाही, कष्टांचे शरीर आहे माझं. तरी आपण डॉक्टरांच्या देखरेखीखाली कोरोनाचे पुर्ण उपचार घेवू व कोरोनामुक्त होवू, कोरोना रिपोर्ट पॅाझीटिव्ह आल्यानंतर लगेचच किसनराव रूस्तुम शिंदे यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांना समजावून सांगितले.