
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । फलटण । रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने फलटण येथे पंढरपुर पूल, जिंती नाका पूल, इरिगेशन बंगला कोळकी येथे अनंत चतुर्थी दिवशी 8 टन निर्माल्य गोळा करण्यात आले.

शुक्रवारी दिवसभर निर्माल्य गोळा करण्यात आले. अंदाजे 8 टन निर्माल्य सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत 300 ते 350
श्रीसदस्यांमार्फत निर्माल्य गोळा करण्यात आले. पाणी प्रदूषण होवू नये व पर्यावरणाचा समतोल राखला जावा. या हेतूने गेल्या 5 वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविला जातो.

निर्माल्यांचे कंपोस्ट खत तयार करून ते खत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या झाडांना घालण्यात येणार आहे.
या निर्माल्य उपक्रमाचे फलटण शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.
