राष्ट्रीय महामार्ग व जिल्हा महामार्गांना जोडणार्‍या माढा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी ५५ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर; खा. रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ एप्रिल २०२३ | फलटण |
माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग व जिल्हा महामार्गांना जोडल्या जाणार्‍या रस्त्यांच्या विकासासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ५५ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातत्याने पत्राद्वारे ना. गडकरी यांच्याकडे या रस्त्यांच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाला व जिल्हा महामार्गाला जोडल्या जाणार्‍या रस्त्यांसाठी सातत्याने पत्राद्वारे व समक्ष भेटून निधीची मागणी केली होती. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुचवलेल्या मागणीनुसार रस्त्यांच्या कामाची यादी पत्राद्वारे मंजूर केली आहे. त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील वेळापूर-तांदूळवाडी एमडीआर २०८ यासाठी ४.९० कोटी, अकलूज ते वेळापूर रस्त्यासाठी १६ कोटी ६६ लाख रुपये, माण तालुक्यातील वडजल येथे पूल बांधण्यासाठी १ कोटी ९६ लाख रुपये, माणगंगा नदीवर टाकेवाडी, पांगरी, वावरहिरे, आनंद, पळशी, पिंपरी येथे पूल बांधणे ७ कोटी ८४ लाख व कुरवली, मांडवखडक, दालवडी, उपळवे, कुरोली रोड एमडीआर ६७ या रस्त्यासाठी २४ कोटी ५१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे या परिसरातील दळणवळणास चालना मिळेल व रस्ते चांगल्या पद्धतीने होतील, या कामांसाठी एकूण ५५ कोटी ८७ लाख रक्कम मंजूर झाले आहेत.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मतदारसंघातील विकास कामांसाठी विविध पद्धतीने सातत्याने झटत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे मतदार संघातील अनेक विकास कामे मार्गी लागलेली आहेत.


Back to top button
Don`t copy text!