दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२४ | फलटण |
चौधरवाडी (ता. फलटण) येथील महावितरणच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरमधील १०० किलो वजनाची कॉपर वायर (अंदाजे किंमत ५० हजार) चोरट्यांनी लंपास केल्याची घटना फिर्याद महावितरणचे कर्मचारी महेश काकडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
यावेळी चोरट्याने ट्रान्स्फॉर्मरमधील २०० लिटर ऑईलचेही नुकसान केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास पो. हवा. नाना होले करीत आहेत.