वारकऱ्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२३ । मुंबई । पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासन खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.

या योजनेत वारी दरम्यान एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून, मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!