दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२३ । बारामती । बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून बारामती मधील महिला व मुलींना स्वतःच्या स्वसंरक्षणा बरोबरच व्यायामाची आवड निर्माण व्हावी याकरिता महिला व बालकल्याण विभागामार्फत प्रतिभा महिला योजनेअंतर्गत आरोग्य सखी उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये एकूण ४५३ महिला व मुलींना स्वसंरक्षण व कराटे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल,देसाई इस्टेट,श्री मन्मथ स्वामी मंगल भवन, स्टेशन रोड, बालकल्याण केंद्र, कसबा बरोबरच नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक १ ते ८ या ठिकाणी गेल्या २५ दिवसापासून देण्यात आले आहे.
बारामती मधील महिला व मुलींना विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती कराटे असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र करळे यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे याचे आभार मानले.
प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार असून हे शिबीर यशस्वी करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या आरती पवार, कविता खरात,संतोष चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. कराटे प्रशिक्षणामध्ये अभिमन्यू इंगुले,महेश डेंगळे,मुकेश कांबळे,आयशा शेख, श्रावणी तावरे, सुमेध कांबळे,पूजा खाडे,श्रुती पानसरे,तेजस्विनी जगताप,फरजाना पठाण आदींनी कष्ट घेतले.