दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या, दि. २७ ऑगस्ट रोजी आयोजित केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांनी दिली.
श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या., फलटण या संस्थेचे सन २०२२-२३ चे लेखापरीक्षण पुणेचे चार्टर्ड अकौंटंट डी. एम. बारस्कर यांनी पूर्ण केले असून या संस्थेस दि. ३१ मार्च २०२३ अखेर १ कोटी १७ लाख एवढा नफा झाला आहे. या संस्थेस ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री. तेजसिंह भोसले यांनी दिली.
या संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता महाराजा मंगल कार्यालय, रिंगरोड, लक्ष्मीनगर, फलटण येथे आयोजित केली आहे. या सभेस सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांनी केले आहे.