सातारा पालिकेचे 307.47 कोटीचे बजट मंजूर


स्थैर्य, सातारा, दि. २७: सातारा पालिकेचे सन 2021-22 चे 307 कोटी 47 लाख 66 हजार 424 रुपयांचे बजेट उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सभागृहात मांडले. बजेटमध्ये किल्ले अजिंक्यतार्‍याच्या विकासासाठी तसेच जुना राजवाडा येथे आर्ट गॅलरी विकसित करणे, अजिंक्यतारा स्मृती उद्यान नुतनीकरण आदी कामांसाठी तरतूद करण्यात आली. या बजेटनुसार नगरपालिकेच्या खात्यात येणार्‍या एक रुपयापैकी 68 पैसे विकासकामांवर खर्च करण्यात येणार आहेत.
तसेच कास धरणाची उंची वाढवणे, भुयारी गटर, घनकचरा व्यवस्थापन, अमृत योजना आदी योजना पूर्णत्वास येवू लागल्या आहेत. कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक उभारणे, नवीन प्रशासकीय इमारत बांधणे यांच्यासाठी तरतूद केली. तसेच हद्दवाढ झालेल्या शाहुपूरी, दरे खुर्दमध्ये पायाभूत सुविधा देण्यासाठी तरतूद करण्यात आहे. पालिकेच्या कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोगाचा फरक, सानुग्रह अनुदान, कर्मचार्‍यांना द्यावयाचे साहित्य, गणवेश वैद्यकीय प्रतीपूर्तीवरील खर्च 2021-22च्या अंदाजपत्रकांत तरतूद केली असल्याने सांगितले.
यंदा कोरोना साथीमुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नात मोठी तूट झाली आहे. यामुळे साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पालिकेला खर्च करावा लागला आहे. अशा परिस्थितीतही पालिकेने अनेक विकासकामे  मार्गी लावली असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी दिली. साविआचे नेते खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शन व सुचनांनुसार सर्वसमावशेक असे बजट पालिकेत मांडले असून ते एकमताने मंजूर झाल्याचीही माहिती सौ. कदम यांनी दिली.
उत्पन्नाच्या ठळक बाबी 
मालमत्ता कर 13 कोटी 75 लाख
पाणी कर 6 कोटी
विशेष स्वच्छता कर 1 कोटी 20 लाख
अग्निशमन कर 20 लाख
हद्दवाढ क्षेत्रातील महसूल 1 कोटी 75 लाख
इमारत भाडे व खुल्या जागा भाडे 1 कोटी 20 लाख
हातगाडा परवाना फी 26 लाख
नाट्यगृह भाडे 10 लाख
विकास कर 3 कोटी
प्रिमीयम 2 कोटी
मंडई फी 9 लाख
महसूली अनुदाने 34 लाख, 43 हजार
भांडवली अनुदाने 122 कोटी 70 लाख 10 हजार
खर्चाच्या ठळक बाबी
कर्मचारी वेतन व भत्ते 23 कोटी 23 लाख 65 हजार
निवृत्ती वेतन 15 कोटी 10 लाख
सातवा वेतन आयोग फरक 3 कोटी 25 लाख
कार्यालयीन व प्रशासकीय खर्च 8 कोटी 46 लाख 10 हजार
देखभाल दुरुस्ती 7 कोटी 98 लाख 10 हजार
शिक्षण मंडळ अंशदान 3 कोटी
शासकीय कर्ज परतफेड 67 लाख
आरोग्य 7 कोटी 17 लाख
पाणी पुरवठा 3 कोटी 72
निवडणूक खर्च 1 कोटी 80 लाख
थोर व्यक्ती जयंती वर्धापन दिन 40 लाख
पर्यावरण 5 लाख
दिव्यांग 39 लाख
मागासवर्गीय कल्याण 39 लाख
महिला व बालकल्याण निधी 39 लाख
भांडवली विकास कामे 202 कोटी, 78 लाख 8 हजार

Back to top button
Don`t copy text!