बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी एकास ३ वर्षे सक्तमजुरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २३ जानेवारी २०२४ | फलटण |
पिंप्रद (ता. फलटण) येथे २६ जानेवारी २०२० रोजी आरोपी तानाजी दौलत भगत (वय ५८) याने त्याच्या राहत्या घरात फिर्यादी यांची पीडित मुलगी हिस गोड बोलून घरात नेऊन तिच्या बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक यु. एस. शेख यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले होते. हा खटला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा श्रीमती के. व्ही. बोरा यांच्या कोर्टात चालून सरकारतर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील, सातारा महेश शिंदे यांनी काम पाहिले होते. या केसमध्ये एकूण ७ साक्षीदार तपासले जाऊन सरकारी वकील यांचेकडील पुरावे ग्राह्य धरून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी यातील आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व १५०० रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

या खटल्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे महिला पो.ह. साधना कदम व पोलीस अंमलदार बडे यांनी कामकाज पाहिले.

Back to top button
Don`t copy text!