
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । कोरेगाव । सुर्ली ता. कोरेगाव येथे काल रात्री १० वाजता इर्टिका गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात आर्वी ता. कोरेगाव जि. सातारा येथील ३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे
आर्वी ता .कोरेगाव येथील तुकाराम आबाजी माने (वय 65 ),तानाजी आनंद माने (वय 62) सुभाष गणपत माने (वय 60 )हे तिघेजण साताराहून आर्वीकडे येत असताना सुर्ली गावा नजीक असलेल्या वळणावर इर्टिका गाडीचा ताबा सुटल्याने ही गाडी पलटी झाली या भीषण अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाली होते. या तिघांना वाठार किरोली येथील युवकांनी सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र रस्त्यातच या तिघांचा दुर्दैवी अंत झाला. आर्वी येथील तीन जणांचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
