स्थैर्य, सातारा, दि.१७: शाहूपुरी येथे महिलेले गंठण हिसकावून नेणार्या दोघांना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने जेरबंद केले आहे. ऋषिकेश पांडुरंग देटे वय 24 वर्ष रा. सेक्टर नं. 15 कोपरखैरणे नवी मुंबई आणि सुनिल रामचंद्र भोसले वय 43 वर्ष रा. शाहुपुरी सातारा अशी त्यांची नावे आहेत. यातील ऋषिकेश देटे यास नवी मुंबईतून अटक केल्यानंतर त्याने मुंबईत केलेल्या आणखी दोन जबरी चोर्यांचा छडा लागला आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 13 रोजी सकाळी 10च्या सुमारास शाहुपुरी चौकाजवळील समतापार्क परिसरात पायी चालत निघालेल्या एका धुणीभांडी काम करणार्या महीलेचे गळ्यातील सोन्याचे गंठण एका अनोळखी मोटारसायकस्वार इसमाने जबरदस्तीने हिसकावुन (चैन स्नॅचिंग) जबरी चोरून नेले होते. त्याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीसांचे पथक घटनास्थळी भेट देवुन, फुटेज चेक करुन व माहीती घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रयत्न करत होते. दरम्यान पोलिसांना ही जबरी चोरी मुंबईतील एका तरुणाने व सातारा येथील नातेवाईकाने संगनमताने केल्याचे माहिती मिळाली. या अनुषंगाने पथकाने अधिक माहीती संकलित करुन पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक मंगळवारी सांयकाळी नवी मुंबई येथे रवाना केले. सातारा येथील दुसर्या डी.बी. पथकाने मुख्य आरोपीचे नातेवाईकास शोध घेवून ताब्यात घेतले. तपासामध्ये आरोपीकडुन गुन्हयात वापरलेली सी.बी.झेड इस्ट्रिम मोटारसायकल व गुन्हयातील सोन्याचे 14 मणी असा एकुण 45 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याची दि. 19 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे. नवी मुंबई येथे गेलेल्या पथकाने स्थानिक पोलीसांचे मदतीने कोपर खैरणे भागात आरोपीचा शोध घेतला. तेथे स्थानिक अडचणींना तोंड देत संपुर्ण रात्रभर पोलीस निरीक्षक संजय पतंगे सो, स.पो.नि. विशाल वायकर यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनानुसार शोधमोहीम राबवुन सापळा लावुन पहाटे मुख्य आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर सखोल तपास केला असता त्याने नवी मुंबईमध्ये कोपर खैरणे पोलीस ठाणे हद्दीत दोन चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तेथील स्थानिक पोलीसांनी दाखल चैन स्नॅचिंगचे गुन्हयात आरोपीस अटक केली आहे. त्यास आरोपीस शाहपुरीकडील चैन स्नॅचिंगचे गुन्हयात ताब्यात घेणेची प्रक्रिया सुरू आहे.
या गुन्हयाचा तपास स.पो.नि. विशाल वायकर, स.पो.नि. संदीप शितोळे करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहा.पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदिप शितोळे, पो.हेड.कॉ. हसन तडवी, आशिष कुमठेकर, पो.ना.लैलेश फडतरे, श्रीनिवास देशमुख, अमित माने, स्वप्निल कुंभार, पो.कॉ. पंकज मोहिते, ओंकार यादव, मोहन पवार, सचिन पवार यांनी केली आहे.