फलटण ग्रामीण पोलिसांकडून २३ जण तात्पुरते तडीपार


दैनिक स्थैर्य | दि. ४ मे २०२४ | फलटण |
माढा लोकसभा मतदारसंघातील मतदान दि. ७ मे २०२४ रोजी असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशांप्रमाणे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी जिल्ह्यामध्ये ज्यांच्या विरुद्ध दोनपेक्षा जास्त मालमत्तांविरुद्ध, शरीराविरुद्धचे गुन्हे, अवैधपणे दारू विक्री गुन्हे, मटका जुगार गुन्हे आहेत, अशा लोकांना तात्पुरत्या स्वरूपात दिनांक ५ मे ते ७ मे दरम्यान तडीपार करावे, याबाबतचा अहवाल फौजदारी प्रक्रिया संहिता १४४ प्रमाणे उपविभागीय अधिकारी, फलटण सचिन ढोले यांच्याकडे पाठवला असता, त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ प्रमाणे फलटण तालुक्यातील २३ लोकांना तात्पुरत्या स्वरूपात दोन दिवसांसाठी तडीपार केले आहे.

तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार असे :

१. साजन पवन भोसले, राहणार सांगवी, तालुका फलटण
२. गोकुळ बापू मदने, राहणार नव सर्कल, फडतरवाडी, तालुका फलटण
३. शाहूराज विठ्ठल जगताप, राहणार साखरवाडी, तालुका फलटण
४. गणेश संपत खलाटे, राहणार खुंटे, तालुका फलटण
५. अक्षय विजय चव्हाण, राहणार साठे फाटा, तालुका फलटण
६. देविदास अभिमान काळे, राहणार साखरवाडी, तालुका फलटण
७. महेंद्र नारायण निकाळजे, राहणार विडणी, तालुका फलटण
८. विशाल बापू वाडकर, राहणार सुरवडी, तालुका फलटण
९. धनंजय नंदू करचे, राहणार संबंधित, तालुका फलटण
१०. आर्यन शंकर कांबळे, राहणार सांगवी शाहूनगर, तालुका फलटण
११. रोहित उर्फ भैय्या प्रकाश लोंढे, राहणार सांगवी, तालुका फलटण
१२. गणेश श्रीमंत माने, राहणार सांगवी शाहू नगर, तालुका फलटण
१३. प्रकाश गुलाब मोरे, राहणार भाडळी बुद्रुक, तालुका फलटण
१४. मनोहर धनंजय जाधव, राहणार साखरवाडी, तालुका फलटण
१५. रामदास विनायक मंडले, राहणार शाहूनगर सांगवी, ता. फलटण
१६. ज्ञानेश्वर बापू चव्हाण, राहणार शेरे शिंदेवाडी
१७. रामचंद्र दशरथ लोंढे, राहणार बरड
१८. सुनील संजय आढाव, राहणार गुणवरे
१९. नागेश दीपक कुराडकर, राहणार गुणवरे
२०. श्रेयस उत्तम नाळे, राहणार दुधेभावी
२१. अमित विठ्ठल उभे, राहणार धुमाळवाडी
२२. अशोक बापूराव चव्हाण, राहणार खटके वस्ती
२३. रोहित तानाजी शिंदे, राहणार पिंपळद

आणखीन काही गुन्हेगारांच्या तडपारीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच यापूर्वी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६, ५५ व ५७ प्रमाणे सुद्धा सहा गुन्हेगार तडीपार असून काही लोकांचे आदेश प्राप्त होणार आहेत. तडीपारीनंतरही सदर आरोपी मिळून आल्यास त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!