
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ०२ ऑक्टोबर २०२४ | फलटण | फलटण येथील ब्राम्हण गल्ली येथे असणारा डी.पी. शिफ्ट करण्यासाठी विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून १८ लाख ७ हजार ६१० रुपये मंजूर करण्यात आले असून या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते उद्या दि. ०३ सप्टेंबर रोजी सकाळी ०९ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी दिली.

तरी ब्राह्मण गल्ली सह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
