
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, पुणे दि.5 : पुणे शहरात वाहतुक शाखेस 173 वाहने जमा असलेली वाहने ही पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथे जमा आहेत. या 173 बेवारस वाहनांच्या मालकांनी त्यांची वाहने पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे या ठिकाणी समक्ष हजर राहून ओळखून घेवून जावीत.
ही वाहने 4 दिवसात ओळखून न नेल्यास या वाहनांवर बेवारस वाहने या सदराखाली लिलावाची कार्यवाही करण्यात येईल, असे येरवडा वाहतुक विभाग, पुणे शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे.
