दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२१ । लोणंद । लोणंद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सतरा जागांसाठी तब्बल १६३ अर्ज दाखल करण्यात आले असून जवळपास सर्वच प्रमुख पक्षांनी बंडाळी टाळण्यासाठी आपले अधिकृत उमेदवार अगदी शेवटच्या क्षणी जाहीर करून बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न केला.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळ पासूनच उमेदवारांची कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ चालू होती. फलटणचे प्रांत शिवाजीराव जगताप आणि मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी आलेले सर्व अर्ज भरण्यासाठी चोख नियोजन केल्याने प्रचंड गर्दी असूनही सर्व इच्छुकांचे अर्ज वेळेत भरले गेले. यावेळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली.
आज सायंकाळपर्यंत दाखल करण्यात आलेल्या अर्जानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे असणार आहेत छाया सूर्यकांत पाटोळे, सचिन नानाजी शेळके, भरत शंकरराव शेळके, मनिषा हेमंत शेळके, मधुमती कैलास पलंगे, वैशाली विकास केदारी, शिवाजीराव शंकरराव शेळके, सीमा वैभव खरात, रशीदा शब्बीरभाई इनामदार, छाया सुभाष घाडगे, सुप्रिया गणेश शेळके, गणी जुसुफ कच्छी, रविंद्र रमेश क्षीरसागर तर भाजपकडून दिपाली संदिप शेळके-पाटील, रत्नप्रभा संजय माळी, प्रतिभा गोरख जगताप, प्रथमेश संजय माळी, नंदकिशोर तुळशीराम पवार, ढगेश संपतराव खालिंदे, सुनिल बाबू कुचेकर, ज्योति दीपक डोणीकर, आनंदराव शंकरराव शेळके-पाटील, हर्षवर्धन आनंदराव शेळके-पाटील, संग्राम आनंदराव शेळके-पाटील, अपर्णा राकेश क्षीरसागर, विनया नंदकुमार गुंडगे, तृप्ती राहूल घाडगे, स्नेहलता आनंदराव शेळके-पाटील, प्राजक्ता शेळके-पाटील, नितीन विनायक भगत, सचिन जयसिंग क्षीरसागर आणि शिवसेनेकडून कुसुम विश्वास शिरतोडे, उर्मिला संतोष रिटे, गणेश बालाजीराव माने, अशोक कृष्णराव शेळके, पाटील, भुषण सुरेश खरात, कविता नंदकुमार माने, अरुण गोविंद गालिंदे, प्रणाली सागर खरात, अनिता बबुमान माचवे, सुनिल यादव असे अधिकृत उमेदवार असणार आहेत तर काँग्रेसमधून दिपाली निलेश शेळके, सर्फराज बागवान, रमेश कर्णवर, शकुंतला सचिन शेळके, राजेंद्र डोईफोडे, निलम जयकुमार सावंत, रघुनाथ शेळके, माया दत्तात्रय खरात, स्वाती शरद भंडलकर , मंगल विलास निंबाळकर, विजया शिवाजी कुंडलकर, नाना शंकर जाधव, शिवाजी नारायण लोखंडे असे अधिकृत उमेदवार असणार आहेत .
प्रभागनिहाय प्राप्त झालेले उमेदवारी अर्ज पुढील आहेत प्रभाग १ साठी १० अर्ज, प्रभाग २ साठी ४ अर्ज, प्रभाग क्र ३ साठी ११ अर्ज, प्रभाग, ४ साठी ११, प्रभाग ५ साठी, १० , प्रभाग ६ साठी, ७, प्रभाग ७ साठी, १४ अर्ज, प्रभाग ८ साठी ४, प्रभाग ९ साठी १९, प्रभाग १० साठी १०, प्रभाग, १्१ साठी ७, प्रभाग १२ साठी १६, प्रभाग १३ साठी ९ , प्रभाग १४साठी ९, प्रभाग १५ साठी, ७, प्रभाग १६ साठी ८ आणि प्रभाग १७ साठी ७ अर्ज असे एकूण १६३ अर्ज उमेद्वारांनी दाखल केले आहेत
दुपारी तीन नंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ओबीसीसाठी राखीव असलेले प्रभाग क्रमांक एक , दोन, अकरा आणि सोळा येथील निवडणूक प्रक्रिया स्थगित करत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी जाहीर केल्यानंतर या चार प्रभागातुन इच्छुक उमेदवारांना आपली निराशा लपवता आली नाही. यावेळी त्यांनी उर्वरित प्रभागात आधीच जाहीर करण्यात आलेल्या प्रमाणे निवडणूक कार्यक्रम पार पडणार असल्याचे स्पष्ट केले.