स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातारा जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेच्या मूळ प्रारूप आराखडयात 110.50 कोटी वाढ, 375 कोटी रुपयाच्या आराखड्यास मान्यता – उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार

महाबळेश्वर,सातारा सैनिक स्कूलच्या विकासासाठी राज्याच्या अर्थ संकल्पात तरतूद करणार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 12, 2021
in सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि.१२:  सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2021-2022 मूळ 264 कोटी रुपयाच्या प्रारूप आराखड्यात 110 कोटी वाढ करून 375 कोटी रुपयाच्या निधीच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आल्याची माहिती देऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सातारा शहरात सैनिक स्कूल सुरु झाले आहे. या सैनिक स्कूलचा राज्यासह देशात नावलौकीक वाढावा यासाठी येथील इमारती व इतर कामांसाठी वेगळ्या निधीची तरदूत अर्थ संकल्पात करण्यात येईल अशी ग्वाहीही वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जिल्हा वार्षिक योजना 2021-22 (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे येथे वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, अतिरिक्त मुख्य सचिव देबाषीश चक्रवर्ती, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात वन विभागाने फॅगोडाचे काम अतिशय उत्तम करावे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, आत्तापर्यंत वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी वेळोवेळी वृक्षरोपन करण्यात आले आहे. या वृक्ष जगविण्यासाठी मनरेगाचा निधी वापरावा. स्मशानभूमीतील पत्र्यांचे शेड हे वारा, पाऊस व ज्वालामुळे खराब होऊ शकतात त्यामुळे स्मानशभूमतील शेड कायम स्वरुपी रहावे यासाठी सिमेंट क्राँक्रीटचे स्लॅब टाकावे, अशाही त्यांनी बैठकीत सूचना केल्या.
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्याबाबतीत प्रत्येक 15 दिवसांनी वरिष्ठस्तरावर बैठक घेण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या कृष्णानगर येथील जागेवर अतिक्रण होणार नाही तसेच तेथील झाडे तोडली जाणार नाहीत यावर लक्ष द्या,असे कोणी केलेले आढळले तर त्यावर कडक कारवाई करावी. याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे तसेच पालकमंत्री यांनी वेळोवेळी भेटी देऊन आढवा घ्यावा अशी सूचनाही केली

पर्यटनाचा चालना देण्यासाठी महाबळेश्वरचा विकास, राज्यासह देशात सातारा सैनिक स्कूलचा नाव लौकीक वाढावा यासाठी इमारत, इतर सुविधा व सुशोभीकरणासाठी तसेच शासकीय विश्रामगृहात देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतुद करण्यात येणार असल्याचेही वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले. यावेळी आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे यांनी विकासाबाबत मुद्दे उपस्थितीत केले.


ADVERTISEMENT
Previous Post

90 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु

Next Post

दुसरी कसोटी काळ्या मातीच्या पिचवर; गोलंदाजांना फायदा; चेंडू अधिक उसळेल

Next Post

दुसरी कसोटी काळ्या मातीच्या पिचवर; गोलंदाजांना फायदा; चेंडू अधिक उसळेल

ताज्या बातम्या

एमजी इंडियाद्वारे नांगिया स्पेश्यालिटी हॉस्पिटलला पाच हेक्टर ऍम्बुलन्स दान

March 2, 2021

औंध येथील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा केदार चौक नजीकचा बंधारा हटविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू

March 2, 2021

एमएसएमईंच्या डिजिटल परिवर्तनासाठी ट्रेड इंडियाचा पुढाकार

March 2, 2021

ओरिफ्लेमने जिओर्डानी गोल्डची नवीन उत्पादने लॉन्च केली

March 2, 2021
शेंद्रे ता. येथे मधुमक्षिका पालन शिबीराचे उदघाटन करताना श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले. शेजारी डी. आर. पाटील, निसार तांबोळी, श्रीमती हेमलता फडतरे व मान्यवर

मधुमक्षिका पालन हा फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय – सौ. वेदांतिकाराजे

March 2, 2021

एमजी मोटरद्वारे सर्वाधिक उत्पादन, बुकिंग आणि विक्रीची नोंद

March 2, 2021

वेधिक अ‍ॅकॅडमीमधून उत्तमोत्तम प्रशासकीय अधिकारी घडावेत : आ.दीपक चव्हाण

March 2, 2021

अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा

March 2, 2021

राष्ट्रीय जंतनाशक मोहीमे अंतर्गत गोखळी येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप

March 2, 2021

अर्थसंकल्पात लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची घोषणा केलेली असूनदेखील मोदी सरकार सामान्य लोकांकडून पैसे का घेत आहे? – श्री पृथ्वीराज चव्हाण  

March 2, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.