
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ५ डिसेंबर २०२३ | फलटण |
बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत पिंपळाच्या झाडाखाली ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात देशी दारूच्या १५ बॉटलसह एकूण १०५० रूपयांचा मुद्देमाल अवैध विक्री करताना जप्त केला.
या प्रकरणी राजेंद्र नामदेव लोंढे (रा. बरड, ता. फलटण) याच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक तपास पो.ह. अभंग करत आहेत.
