
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२४ | फलटण |
फरांदवाडी, ता. फलटण येथील तांबमळा वस्ती येथील महावितरणची डीपी फोडून त्यातील २५,०००/- रुपये किमतीचे १०० लिटर ऑईल व सुमारे ५० किलो वजनाची कॉपर वायर, असा सुमारे २५ हजार हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीची फिर्याद विजय शिवाजी मदने ((म.रा.वि.वि.कंपनी, रा. नऊ सर्कल, साखरवाडी, ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या चोरीचा अधिक तपास पो. हवा. होले करीत आहेत.
