मोटारसायकलस्वारांकडून १ लाख २२ हजारांची बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न; दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२४ | फलटण |
फलटण शहरातील रविवार पेठ येथे उघडा मारूती मंदिराजवळील मुथूट फायनान्स कंपनीच्या ऑफिससमोर दि. १ मार्च २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास गोल्ड लोण भरण्यासाठी निघालेले अशोक खंडेराव भगत (रा. मेहता हाईट्स, रविवार पेठ, फलटण) यांची १ लाख २२ हजार रूपयांची बॅग दोन मोटारसायकलस्वारांनी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत अशोक भगत हे जखमी झाले.

या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि शिंदे करीत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!