जावली मतदारसंघातील ४७ विकासकामांसाठी १ कोटी ७७ लाख रुपये, आ. शिवेंद्रसिंहराजेंचा विकासकामांचा धडाका; सहा मोठ्या ग्रामपंचायतींची १९ लाख


स्थैर्य, सातारा, दि.९: आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा- जावळी मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरु ठेवला असून जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतींच्या जनसुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेतून सातारा तालुक्यातील २८ आणि जावली तालुक्यातील १९ अशा एकूण ४७ विकासकामांना १ कोटी ७७ लाख रुपये तर मोठ्या ६ ग्रामपंचायतींना १९ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. याशिवाय क वर्ग यात्रास्थळ विकास कार्यक्रमांतर्गत ६ कामांसाठी २६ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर केला आहे.

जनसुविधांसाठी विशेष अनुदान योजनेतून २०२०- २१ या वित्तीय वर्षासाठी सातारा तालुक्यातील म्हसवे येथील बंदिस्त गटर बांधण्यासाठी ३ लाख, वेचले येथे स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी ४ लाख, धनवडेवाडी येथे स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी ४ लाख, आरे तर्फ परळी येथे स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी ४ लाख, जुंगटी येथे स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी ४ लाख, वर्ये येथे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी ३ लाख, केळवली येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी १० लाख, खड्गाव, आलवडी येथे स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी प्रत्येकी ४ लाख, मालदेव व नावली येथे स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी प्रत्येकी ३ लाख, सोनवडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ३ लाख, पाटेघर – जळकेवाडी येथे स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी ४ लाख, राजापुरी येथे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी ४ लाख, आरे येथील अंतर्गत रस्ता करण्यासाठी ६ लाख, कोंडवे येथील मुगुट पवार घर ते दत्तात्रय गाडे घर आणि विघ्नहर्ता कॉलनी येथे बंदिस्त गटर करण्यासाठी प्रत्येकी ३ लाख, सैदापूर येथे सैदर्शन कॉलनी येथे बंदिस्त गटर बांधण्यासाठी ३ लाख, वेळे येथील रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी ५ लाख, कण्हेर येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करण्यासाठी ३ लाख, आगुंडेवाडी येथे रस्ता कांक्रीटीकरण करण्यासाठी ३ लाख, जांभळेवाडी येथे रस्ता करण्यासाठी ३ लाख, भाटमरळी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी १० लाख, आंबवडे बु. येथे स्मशानभूमी बैठक व्यवस्था शेड बांधण्यासाठी ४ लाख, करुन दहिवड शमषांभिमू शेड बांधण्यासाठी ५ लाख, धावडशी येथे अंतर्गत रस्ता व गटर बांधण्यासाठी ३ लाख, जकातवाडी येथे मराठी शाळेजवळील रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ४ लाख, तसेच गटरसाठी ३ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

जावली तालुक्यातील पवारवाडी येथे समशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ३ लाख, सनपाने येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ४ लाख, सोनगाव येथे अंतर्गत गटरसाठी ४ लाख, पुनवडी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी १० लाख, फळणी येथे स्मशानभूमी शेड व रस्त्यासाठी ४ लाख, नांदगने येथे स्मशानभूमी रस्त्यासाठी ३ लाख, केळघर येथील स्मशानभूमी रस्त्यासाठी ३ लाख, बाहुळे येथील स्मशानभूमी रस्त्यासाठी ३ लाख, ओझरे येथे ग्रामपंचायत कार्यालय वाढीव इमारत बांधण्यासाठी २ लाख, काटावली स्मशानभूमी शेड व रस्त्यासाठी ६ लाख, विवर, भालेघर आणि बेलोशी येथे स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येकी ३ लाख, भणंग येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ३ लाख, दुदुस्करवाडी ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी १० लाख, नांदगणे, पुनवडी, भामघर, भिवडी येथे स्मशानभूमी रस्त्यासाठी प्रत्येकी ३ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधेसाठी विशेष अनुदान योजनेतून साताऱ्यातील लिंब येथील गांधी चौक येथे पेव्हर ब्लॉक बसवणे व सुशोभीकरण करण्यासाठी ३ लाख आणि रामेश्वर मंदिर रस्त्यासाठी ३ लाख, शेरी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ३ लाख, किरमाडे मळा येथे रास्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ३ लाख रुपये तर जावली तालुक्यातील कुडाळ येथील अंतर्गत रस्त्यासाठी ४ लाख आणि सावतामाळी चौक ते पानस रस्त्यासाठी ३ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

क वर्ग यात्रास्थळ विकास कार्यक्रम योजनेतून सातारा तालुकयातील कुरुळबाजी येथील घाटाई देवी मंदिर येथे भक्तीनिवास बांधण्यासाठी ८ लाख,परिसरात काँक्रीटीकरण करण्यासाठी ३ लाख, हायमास्ट दिवे बसवण्यासाठी १.५० लाख तर जावली तालुक्यातील मेरुलिंग नरफदेव येथे रस्त्यासाठी ५ लाख, करहर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर सुधारणा करण्यासाठी ४ लाख आणि कुसुम्बी येथील काळेश्वर मंदिर येथे संरक्षक भिंत आणि रस्त्यासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!