
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०९ जून २०२२ । सातारा । पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात येऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या इंदिरानगर झोपडपट्टी येथील रसिक अनिल धोत्रे याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
हा प्रकार गोडोली परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना २१ मे २०२२ रोजी घडली असून याबाबतचा गुन्हा दोन दिवसापूर्वी दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी धोत्रे हा फिर्यादीच्या ओळखीचा होता. त्याने फिर्यादीला मला पाणी दे असे बोलून तिला आज पाठवले दरम्यान आरोपीने घराची आतून कडी लावली आणि अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस एस मुसळे अधिक तपास करत आहेत.
