
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०९ जून २०२२ । सातारा । कारी (किर्दतवाडी) ता. सातारा येथील महिलेला विनयभंगाची तक्रार का केलीस असे विचारणा करत चौघांनी मारहाण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.७ रोजी ३.४५ वाजण्याच्या सुमारास कारी, (किर्दतवाडी) ता. सातारा येथे तेथीलच एका महिला झाडावरचे आंबे काढीत असताना अशोक नामदेव मोरे, सुवर्णा अशोक मोरे, हिराबाई मोरे आणि अन्य एका महिलेने विनयभंगाची तक्रार का केली असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. तसेच संबंधित महिलेचा पती भांडणे सोडण्यासाठी आला असता त्यांनाही शिवीगाळ दमदाटी करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
