ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा इयत्ता बारावीचा १००% निकाल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०९ जून २०२२ । फलटण । गुणवरे ता. फलटण जि. सातारा येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयाचा इयत्ता बारावी ची सायन्स शाखेतून 100 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या सचिव सौ साधनाताई गावडे, अध्यक्ष श्री ईश्वर गावडे, आरटीओ इंस्पेक्टर श्री संभाजीराव गावडे, शाळेचे प्राचार्य श्री गिरिधर गावडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

गुणवरे पंचक्रोशीत ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या एकमेव विद्यालयात सायन्स शाखेतून इयत्ता अकरावी बारावी चे वर्ग सुरू असून शाळेमध्ये भव्य इमारत, विद्यार्थी वाहतूक व्यवस्था, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळाचे मैदान तसेच इतर सर्व भौतिक सुविधांची उपलब्धता असून विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांमार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. तरी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी सायन्स शाखेतून इयत्ता अकरावी बारावीच्या प्रवेशासाठी शाळेशी अथवा 7769889898 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य गिरिधर गावडे सर यांनी केले.

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीचा पहिल्याच वर्षी शंभर टक्के निकाल लागल्याने सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले.

Back to top button
Don`t copy text!