बीड जिल्ह्यातील टोळीवर सलग दुसऱ्यांदा मोका ची कारवाई; पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सलं यांचे आदेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील वडूज औंध उंब्रज येथे दरोडा जीवे मारण्याची धमकी देणे जबरी चोरी घरफोडी अशा गुन्ह्यात द्वारे दहशत निर्माण करणाऱ्या होमराज उर्फ होम्या उद्धव काळे याच्यासह नऊ जणांच्या बीड जिल्ह्यातील टोळीला पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दुसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.

होमराज उर्फ होम्या उद्धव काळे वय 40 राहणार वाकी शिवार तालुका आष्टी जिल्हा बीड हा टोळीचा प्रमुख आहे . अजय उर्फ आजा सुभाष भोसले वय 23 राहणार माहिजळगाव तालुका कर्जत जिल्हा नगर, सचिन उर्फ आरसी सुभाष भोसले वय 24 राहणार माहिजळगाव तालुका कर्जत जिल्हा नगर, अविनाश उर्फ उर्फ महिंद्रा सुभाष भोसले वैद्य 22 माहिजळगाव तालुका कर्जत, राहुल भोसले वय 28 राहणार पारगाव पोस्ट पाथर्डी जिल्हा नगर, अतुल लायलन भोसले राहणार आष्टी जिल्हा बीड, भल्या उर्फ धर्मेंद्र काळे राहणार चिखली तालुका आष्टी, कानिफनाथ उद्धव काळे राहणार वाकी तालुका आष्टी, गणेश उर्फ बन्‍सी काळे राहणार राशीन असे टोळी सदस्यांचे नाव आहे.

या टोळीने उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लुटमारीचे गुन्हे केले होते वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडकाचा माळ शिवारात फिर्यादीच्या घराचा दरवाजा उचकटून फिर्यादीची पत्नी शांताबाई च्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या घरातील एक लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता वडूज पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर टोळीने आर्थिक फायद्याकरिता सातारा जिल्ह्यातील वडूज औंध उंब्रज तसेच महाराष्ट्रातील पुणे, बीड, नगर जिल्ह्यातील पोलिस ठाणे हद्दीत जबरी चोऱ्यांचे प्रकार केले होते सोन्या चांदीचे दागिने लांबवणे, रोख रकमेची लूटमार करणे ,जबर दुखापत करणे, इत्यादी गुन्ह्यांची नोंद या टोळीवर होती.

वडूज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक एम बी देशमुख यांनी या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 नुसार पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव दाखल केला होता तो प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोज लोहिया यांना सादर करण्यात आला परिक्षेत्र कार्यालयाच्या मंजुरीनंतर या आदेशाची पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी अंमलबजावणी केली या टोळीवर सलग दुसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास डॉक्टर श्री निलेश देशमुख दहिवडी उपविभाग यांनी केला आहे . मोका प्रस्ताव मंजुरी करता अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी कॅम्पचे उपअधीक्षक डॉक्टर निलेश देशमुख दहिवडी कॅम्प वडूज पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम बी देशमुख उपनिरीक्षक पीआर दीक्षित अमित सपकाळ दादासाहेब देवकुळे ,सागर पडते, अर्जुन खाडे, यांनी या कारवाईत सहभाग घेतला पोलिस अधीक्षकांनी सातारा जिल्ह्यात कार्यभार स्वीकारल्यापासून अकरा संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील 68 इसमांना मोक्का लावला आहे तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार 132 जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!