बरड येथे स्फोटकांचा साठा जप्त; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२६ | फलटण |
बरड (ता. फलटण) येथील रांजणी पुनर्वसन परिसरात बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला स्फोटकांचा मोठा साठा फलटण पोलिसांनी जप्त केला आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत २४ लाख ७२ हजार १ रुपयांचा ठेवल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका संशयिताला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ रोजी सायंकाळी बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरातील बंद मराठी शाळेसमोरील मैदानात एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणत बेकायदेशीर स्फोटके साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये कोणताही वैध परवाना नसताना स्फोटके साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी एकूण ५०४ बॉक्स स्फोटके व ट्रक जप्त केला.

याप्रकरणी शंकरलाल बेनीराम जाट (रा. बरड, ता. फलटण) आणि हेमराज महावीर जाट (मूळ रा. भिलवाड़ा, राजस्थान राज्य रा. बरड, ता. फलटण) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून हेमराज महावीर जाट याला अटक केली आहे.

Back to top button
Don`t copy text!