पेन्शनची मागणी ही त्यांच्या हक्काची : श्रीमंत संजीवराजे; राज्य कर्मचार्‍यांच्या पेन्शन मागणीला पाठींबा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२३ । फलटण । ‘‘जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचार्यांचा संप सुरु आहे. राज्य कर्मचार्‍यांची पेन्शनची मागणी ही त्यांच्या हक्काची असून त्यांच्या या मागणीला आपला पाठींबा आहे’’, अशी भूमिका सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केली.

जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी दि. 14 मार्च 2023 पासून गेली तीन दिवस फलटण येथील अधिकारगृह येथील दरबार हॉल मध्ये राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे बेमुदत संप आंदोलन सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर फलटण एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर आंदोलनाचे निवेदन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना दिले; त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी निवेदन देण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Back to top button
Don`t copy text!